आता भाजप प्रदेश अध्यक्षानी दिलेल्या उमेदवाराविरोधात स्वतःचा महापौर पदाचा उमेदवार समोर केल्याची सणसणीखेज माहिती ?
चंद्रपूर:-
चंद्रपूरमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मागे “भाऊ-भाऊ” म्हणतं आपली राजकीय कारकीर्द सुरु करणारे आणि त्यांच्याच अर्थपूर्तीतून व छत्रछायेत आमदार पदापर्यंत पोहचणारे आमदार किशोर जोरगेवार हें आपल्या गुरुतुल्य मुनगंटीवार यांनाच शह देण्याच्या प्रयत्नात आता चक्क भाजप प्रदेश अध्यक्ष यांच्याच उमेदवाराला आव्हान देत स्वतःच्या मर्जीतील उमेदवार चंद्रपूर मनपा महापौर पदासाठी दिल्याची सणसणीखेज माहिती पुढे आली आहे, दरम्यान चंद्रपूर मनपा निवडणुकीत अगोदरचं वरिष्ठानी भाजप उमेदवाराची यादीत बदल करून भाजप शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्ष विरोधी खेळी केली होती व स्वतःच्या मार्जिचे उमेदवार समोर केले आणि त्या 17 भाजप कार्यकर्त्यांची उमेदवारी डावलून त्यांचे राजकीय जीवन उध्वस्थ केलेआहे, त्याचा फटका भाजपला बसला आणि 36 नगरसेवक असलेल्या भाजपला केवळ 23 जागावर समाधान मानावे लागले, असे असतांना आता भाजप प्रदेश अध्यक्ष यांनी महापौर पदाचा उमेदवार म्हणून संगीता खांडेकर यांचे नाव जाहीर केले असतांना आमदार जोरगेवार यांनी अँड सारिका संदूरकर हा महापौर पदाचा उमेदवार पुढे करून नामांकन फॉर्म भरला आणि पुन्हा एक पक्ष विरोधी भूमिका घेतली असल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान मुनगंटीवार-जोरगेवार यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, तो अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक भाजपातील गटबाजीचा परिणाम समोर आला आणि अवघ्या 23 जागावर भाजप सिमटली असतांना आता जोरगेवार यांनी पुन्हा एक पक्ष विरोधी खेळी करून मुनगंटीवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या महापौर पदाच्या उमेदवाराविरोधात किशोर जोरगेवार यांनी स्वतःचा मर्जीतील उमेदवार दिल्याने भाजप चा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे, ज्यामुळे आगामी काळात पक्षात गटबाजी वाढू शकते.
मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार वादामुळे भाजप कार्यकर्त्यांची गोची?
गावखेड्यावर एक म्हण खूप प्रचलित आहे “पोसलं कुत्र जिवाला काळ” अगदी अशीच राजकीय परिस्थिती सध्या महाराष्ट्रात असून ज्या ज्या नेत्यांनी आपल्या तालीमीत कार्यकर्ते वाढविले त्या कार्यकर्त्याला जेंव्हा संधी मिळाली त्या कार्यकर्त्यांनीचं मग आपल्या नेत्याला शह देण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना महाराष्ट्रात सर्वत्र आहे, अगदी त्याचं धर्तीवर राज्याचे भाजप नेते ज्यांनी किशोर जोरगेवार या साधारण कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन आर्थिक राजकीय दृष्ट्या बळ दिलं आज तेच किशोर जोरगेवार आमदार झाल्यावर आपल्या गुरुतुल्य नेत्याला शह देण्याचा प्रयत्न कटताहेत हें अत्यंत दुर्दैवी असून आमदार जोरगेवार यांच्या नैतिकतेवर आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दरम्यान मुनगंटीवार जोरगेवार वादात भाजप कार्यकर्त्यांची गोची झाली असून त्या 17 भाजप कार्यकर्त्यांचे राजकीय भविष्य यामुळे उध्वस्थ झाले आहे.




