कांग्रेसचे धुरंदर नेते विजय वडेट्टीवार हतबल, महापौर पदाच्या लालसेने कांग्रेसची हातातली सत्ता जाणार?
चंद्रपूर :-
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या 27 नगरसेवकासह आघाडीत लढवलेले पपू देशमुख गटाचे तीन सदस्य मिळून 30 नगरसेवक आणि दोन कांग्रेस बंडखोर एक एमआयएम आणि एक बिएसपी असे मिळून 34 चा बहुमताचा आकडा झाला असतांना खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हेकेखोर धोरणामुळे मी म्हणेल तो महापौर अशी तटस्थ भूमिका घेतली आहे, दरम्यान राजकीय चाणक्य असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी सत्तेचे जे गणित मांडले ते गणित पूर्णतः गडबडले असून कांग्रेसच्या वरिष्ठाकडे झालेल्या समन्वय बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांना महापौर पदासाठी संख्याबळ जुळविण्याची जबाबदारी दिल्याने व कांग्रेस सोबत लढलेले पप्पू देशमुख सुद्धा आपली चार नगरसेवक पदाची ताकत दाखवून उपमहापौर पद मागत आहे, त्यामुळे सत्ता स्थापणेसाठी पुन्हा तीन नगरसेवक आणायचे कुठून हा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने सत्ता स्थापणेसाठी संख्याबळ जुळत नसल्याने कांग्रेसच्या हातातील सत्ता भाजप कडे जाण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान कांग्रेस च्या एकूण 27 पैकी 13 नगरसेवकांना सोबत घेत शुक्रवारी संध्याकाळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली. विशेष म्हणजे या घडामोडीची माहिती कळताच विजय वडेट्टीवार समर्थकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जात ही प्रक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या पत्राला अनुसरण नाही, अशी विभागीय आयुक्तांकडे भूमिका मांडली. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परस्पर दाव्यामुळे आता विभाग आयुक्त याबाबत मंगळवारी आपला निर्णय देणार आहेत.
शुक्रवारला दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर संध्याकाळी काँग्रेस पक्षात उघड फूट पडली. खासदार प्रतिभा धानोरकर अचानक संध्याकाळी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात गेल्या आणि त्यांनी काँग्रेसच्या गटाची स्थापना केली. दरम्यान नागपुरात आलेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून गटनेता पदी लवकरच आपण नाव पाठवू, असं सांगितलं होतं. मात्र काँग्रेसच्या गटनेता पदाबाबत एकमत न झाल्यामुळे संध्याकाळपर्यंत गटाची नोंदणी अडली होती. विजय वडेट्टीवार यांच्याकडून गटनेता पदासाठी देण्यात आलेल्या वसंता देशमुख यांच्या नावाला प्रतिभा धानोरकर यांचा विरोध होता. तर प्रतिभा धानोरकर यांच्याकडून देण्यात आलेल्या सुरेंद्र अडबाले यांच्या नावाला वडेट्टीवारांचा विरोध होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेत्याचं नाव शेवटपर्यंत निश्चित करू शकले नाही. मात्र संध्याकाळी प्रतिभा धानोरकर यांनी अचानक उचललेल्या या पावलामुळे काँग्रेस मधील घटबाजी टोकाला गेली आहे तर दुसरीकडे काँग्रेसमधील या गटबाजीचा आणि गोंधळाचा फायदा भाजप उचलून सत्ता स्थापनेची तयारी करत आहे.
उबाटा च्या त्या गटाकडे सर्वांचे लक्ष?
उबाटा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी आपल्या वंचित च्या दोन नगरसेवकांसह आठ नगरासेवकांचा गट स्थापन करून आपल्याला जो महापौर पद देईल त्यांच्यासोबत जाणारं असे संकेत दिले होते, दरम्यान आता पुन्हा दोन अपक्ष नगरसेवक सुद्धा त्यांच्या गटात आले असल्याचे बोलल्या जात आहे, मात्र भाजपाच्या नेत्यांनी ती ऑफर धुडकावून लावल्यानंतर ते उपमहापौर पद सुद्धा घेण्यास तयार झाले. कांग्रेस मध्ये अगोदरचं पप्पू देशमुख यांचा उपमहापौर पदावर डोळा आहे आणि त्यांना कांग्रेस बंडखोर नंदू नागरकर यांची एलर्जी आहे, त्यामुळे समीकरणे बदलत असून बहुमताचा आकडा कांग्रेस कडे वडेट्टीवार यांनी जुळवला असतांना सुद्धा आता तो खासदार धानोरकर यांच्याच्या तटस्थ भूमिकेमुळे तो जुळेल का? याबद्दल शंका आहे, अर्थात कांग्रेसच्या हातातली सत्ता जाणार अशी शक्यता आहे. आता उबाटा सेना वंचित च्या दोन नगरासेवकासह जर कांग्रेस सोबत आले तरच कांग्रेसला सत्ता स्थापन करता येऊ शकते अन्यथा चंद्रपूर मनपात भाजपचा महापौर होण्याची शक्यता आहे.




