Home चंद्रपूर धूमचक्री :- चंद्रपूर मनपात कांग्रेसचा महापौर करण्यासाठी कांग्रेसचे विधिमंडळ नेते वडेट्टीवार मैदानात?

धूमचक्री :- चंद्रपूर मनपात कांग्रेसचा महापौर करण्यासाठी कांग्रेसचे विधिमंडळ नेते वडेट्टीवार मैदानात?

कांग्रेस खासदार धानोरकर विरुद्ध विधिमंडळ नेते वडेट्टीवार वादाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन लोटस चा धोका?

चंद्रपूर:-

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत द्वंदाने महानगरपालिका निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही, भाजप मध्ये तर आमदार किशोर जोरगेवार यांनी शहर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांना समोर करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या तब्बल 17 समर्थकांचे नाब यादीतून कमी करून त्यांचे एबी फॉर्म स्वतःच्या समर्थकांना दिले, याचे पडसाद राज्याच्या राजकारणात पडले होते परंतु कांग्रेस मध्ये राज्याचे कांग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद असले तरी कांग्रेस ला आपल्या मित्र पक्षासह बहुमताचा आकडा पार करण्याची नामी संधी आहे.

महापौर कुणाचा होईल याची उत्कंठा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाना आहे, कारण सत्ताधारी भाजपला अंतर्गत कुरघोडीच्या राजकीय पार्श्वभूमीवर सन 2017 चा आकडा पार करता आला नाही, त्यामुळं भाजप बहुमता पासून बरच दूर आहे मात्र तरी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा घेत भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याची प्रसारमाध्यमातून चर्चा आहे. दरम्यान शिवसेना उबाठा गटासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगत काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचे सांगून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळ उडवून दिली. मात्र महापौर पदाबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, महापौर हा भाजपचाच होणार हे त्यांनी स्पष्ट केल्याने उबाटा सेना भाजप कडे जाणार अशी शक्यता वाटत नाही, अर्थात कांग्रेस सोबत वंचितचे दोन, बिएसपी एक, एमआयएम एक असे मिळून पप्पू देशमुख यांच्या संघटनेतील तीन नगरासेवक पकडून 34 चा आकडा कांग्रेस असाच पार पाडू शकते, त्यात कांग्रेस चे दोन बंडखोर नगरसेवक मिळून हा आकडा 36 होतो, त्यामुळे उबाटा सेनेच्या सहा नगरसेवकांची कांग्रेस ला गरज भासणार नाही असे राजकीय चित्र आहे.

कांग्रेस मध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वादाचे कारण काय?

राज्याच्या राजकीय पटलावर सध्या वडेट्टीवर आणि मुनगंटीवार ही दोन नावे प्रकर्षाने आपल्या धारदार वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात, पण त्यांना स्थानिक पक्षातील विरोधकांकडून मात्र विरोध होतं असतो हे सर्वश्रुत आहे, पण तरीही अखेरची बाजी तेच जिंकतात हा सुद्धा अनुभव सर्वानाचं आहे, कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यात राजकीय वैर सर्वानाचं माहीत आहे, त्यातच खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांनी माझ्या मतदार संघात हस्तक्षेप करू नये अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना देऊन वडेट्टीवार यांचं राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न केला खरा, पण जिल्ह्याच्या राजकारणात कांग्रेसला नवसंजीवनी निर्माण करण्यास वडेट्टीवार यांचा खारीचा वाटा आहे हे खासदार धानोरकर यांनी विसरू नये, त्यातच धानोरकर परिवाराला जे राजकीय स्थर्य मिळालं त्यात वडेट्टीवार यांचं मोठं योगदान आहे, स्वर्गीय बाळू धानोरकर यांना कांग्रेसची लोकसभेसाठी जी उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले त्यात विजय वडेट्टीवार यांची भूमिका किती मोठी होती हे जिल्ह्यातील कांग्रेस पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना चांगलंच ठाऊक आहे, त्यामुळे एवढा मोठा नेता जेंव्हा कांग्रेसचाच महापौर होईल अशी ग्वाही देत असेल आणि त्यासाठी ते जर बहुमत तयार करत असेल तर शेवटी ते पक्ष हितासाठीच आहे, त्यामुळे खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्यासोबत वैर न ठेवता कांग्रेस चा महापौर चंद्रपूर मनपा मध्ये बसविण्याची एकवाक्यता ठेवावी अशी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.