रयतवारी कॉलरी प्रभागातील माजी नगरसेवक प्रदीप डे व सहकारी राजू यादव द्वारे हॉटेल पैराडाईज मध्ये जैस्वाल यांच्यावर हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल?
चंद्रपूर :-
नुकत्याच झालेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत अनेक माजी नगरसेवक यांना हार पत्कारावी लागली आहे, दरम्यान ज्यांनी ज्यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला ते आता रडारवर असून मिळालेला पराजय पचणी पडत नसल्याने आता त्या विरोधकांवर हल्ला चढवून मारहान करण्याची नवी परंपरा उदयास आल्याचा प्रत्यय समोर आला आहे, रयतवारी प्रभागातील माजी नगरसेवक प्रदीप डे यांचा या प्रभागात पराजय झाला म्हणून अनिल जैस्वाल या पेट्रोल पंप व्यवसायिक यांच्यावर प्रदीप डे व त्यांचे सहकारी राजू यादवं यांनी हॉटेल पैराडाईज येथे काल हल्ला केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली असून रामनगर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल जैस्वाल यांचे दुर्गापूर आणि ताडाळी येथे पेट्रोल पंप असून त्यांचे रयतवारी कॉलरी परिसरात चांगले मित्र असल्याने ते नेहमी तिथे ये-जा करतात, दरम्यान नुकत्याचं दिनांक 15 जानेवारीला झालेल्या मनपा निवडणुकीत रयतवारी येथील भाजप कडून उभे असलेला जैस्वाल परिवारातील सदस्य निवडून आले असल्याने अनिल जैस्वाल यांनी त्यांचा प्रचार केला असावा हा संशय घेऊम हॉटेल पैराडाईज मध्ये अनिल जैस्वाल हे पैक मारत असतांना माजी नगरसेवक प्रदीप डे व त्यांचे सहकारी राजू यादवं यांनी हॉटेल पैराडाईज मध्ये जैस्वाल यांच्यावर तू विरोधात का प्रचार केला म्हणून हल्ला चढवला व मारहान केली,
यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यानी राजू यादव यांना हॉटेल बाहेर काढले परंतु पुन्हा ते त्यांनी हॉटेल मध्ये येऊन मारहान केली, सदर घटनेची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन येथे दिली असता प्रदीप डे व राजू यादवं यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा अधिकार असतांना असे जर हल्ले होतं असतील तर लोकशाही वाचविण्यासाठी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढलं पाहिजे अशा प्रतिक्रिया जनसामान्य माणसाकडून समोर येत आहे.




