Home चंद्रपूर धक्कादायक :- भाजप आमदार जोरगेवार यांच्या त्या एबी फॉर्म घोटाळ्यामुळे भाजपला मोठा...

धक्कादायक :- भाजप आमदार जोरगेवार यांच्या त्या एबी फॉर्म घोटाळ्यामुळे भाजपला मोठा फटका?

सत्तेचे दरवाजे बंद, नेतृत्व क्षमता नसल्याने निवडणूकीचे नियोजन फसले, मुख्यमंत्र्यांचा रोड शो पण गेला वाया.

चंद्रपूर :

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपची दाणादाण उडवून कांग्रेस ने आपल्या मित्र पक्षांसह सत्ता स्थापन कारण्याचं संख्याबळ मिळवलं आहे, तर सत्तेत असणाऱ्या भाजपला आपल्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा मोठा फटका बसला आहे, खरं तर भाजप अध्यक्ष यांच्याकडून मंजूर झालेली तब्बल 17 उमेदवाराची यादी बदलवली गेली व त्यांचे एबी फॉर्म गायब कारण्याचं कारस्थान आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या माध्यमातून केल्याने भाजपमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता, एका महिला उमेदवारांनी तर एंडी हॉटेल मध्ये गोंधळ घालून माझे पक्षाच्या अधिकृत यादी मध्ये नाव असताना मला एबी फॉर्म का देत नाही म्हणून गोंधळ घातला होता व काही उमेदवारांनी तर पत्रकार परिषद घेऊन आमदार जोरगेवार यांच्यावर रोष व्यक्त केला होता आणि mahasul mantri बावनकुळे यांच्या सभेदरम्यान गोंधळ घालून आमदार जोरगेवार यांच्या विरोधात एबी फॉर्म चोर म्हणून घोषणा केल्या होता, या संदर्भात प्रसारामाध्यमांनी याबद्दल मोठ्या बातम्या पण प्रसारित केल्या होत्या, दरम्यान भाजपच्या निवडणूकीचे सूत्र आमदार जोरगेवार यांच्याकडेच असल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक नाराज होते, पक्षाचे मुख्य संघटन हे आमदार मुनगंटीवार यांच्याकडे असल्याने व जोरगेवार यांच्याकडे त्यांची व्यक्तिगत संघटनेची माणसेचं तेवढी असल्याने भाजप चे कार्यकर्ते विखूरले, त्यात काहींनी बंड पुकारले तर काहींनी अपक्ष उमेदवारी लढली व काही दुसऱ्या पक्षात गेले त्यामुळे भाजपला या बाबीचा मोठा फटका बसला व भाजपची सत्ता गेली.

मनपा निवडणुकीत कांग्रेसमध्ये दोन गट निश्चित होते, मात्र त्यांनी अंतर्गत कुराघोड्या केल्या नाही त्यामुळे यांची एकत्र ताकत निर्माण झाल्याने त्यांनी तब्बल 28 नगरासेवक निवडून आणले तर त्यांचे दोन बंडखोर मिळून हा आकडा 30 वर गेला आहे, पप्पू देशमुख यांच्या संघटनेच्या तीन मिळून हा आकडा 33 वर गेला आहे व आता उबाटा सेनेचे 6 नगरासेवक मिळून 39 नगरासेवकाचे संख्याबळ कांग्रेस आघाडी कडे आहे, त्यामुळे कांग्रेस चा महापौर होईल यात शंका नाही. दरम्यान मागील निवडणुकीत भाजपचं 36 नगरासेवक हे संख्याबळ घटून 23 वर आलं आणि त्यांचं वर्चस्व आता संपुष्ठात आलं आहे.

भाजप ची ही दैना का झाली?

चंद्रपूर जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष असला तरी भाजप च्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षाची पुरती वाट लागली आहे, एकीकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्या गेल्याने मागील नगरपरिषदा नगरपंचायत निवडनुकामध्ये भाजप ला सत्तेपासून दूर व्हावं लागलं होतं, त्यानंतर मुनगंट्टीवार यांनी आपल्याला आमच्या पक्षाच्या वरिष्ठानी कांग्रेस प्रमाणे ताकत दिली नसल्याची खंत प्रसारामाध्यमासमोर बोलून दाखवून भाजप च्या निवडणूकीतील अपयशाच खापर वरिष्ठ नेत्यावर फोडलं होतं, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल होतं की चंद्रपूर महानगरापालिका निवडणुकीत निश्चितपणे सुधीरभाऊंना ताकत देऊ आणि सत्ता आणू, पण निवडणूकीचे सूत्र त्यांच्याकडे दिले नसल्याने व केवळ मार्गदर्शक बनून ठेवल्याने त्यांचा पुन्हा भ्रमनिराश झाला, त्यातच एबी फॉर्म घोटाळा जो आमदार जोरगेवार यांनी केला त्यात मुनगंटीवार यांच्या समर्थकांचे नाव कापल्या गेल्याने कार्यकर्ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात गेले तर काहींनी अपक्ष फॉर्म भरले यामुळे भाजपला फटका बसेल हे निश्चित होते, मात्र त्याची भरपाई भरून काढण्यासाठी राज्यातील निवडणूकीतील व्यस्तता असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर शहरांत रोड शो केला, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोनदा सभा घेतल्या पण तरीही त्याचा काहीही फायदा झाला नाही, उलट भाजप बंडखोर यांच्या संतापाचा त्यांना सामना करावा लागला, यावरून भाजप चे 20 उमेदवार तरी निवडून येईल का? अशी शंका होती, मात्र आमदार सुधीर मुनगंट्टीवार यांनी काही ठिकाणी स्वतःची व्यक्तिगत ताकत वापरून थोडी संख्येत भर पाडली म्हणून भाजपला 23 चा आकडा गाठता आला हे विशेष.