वडगांव प्रभाग क्र. ८ : विकासाच्या हमीची लढाई अधिक मजबूत… भावी नगरसेवक सौ. संगिता वाढई व माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांच्या पुढाकारातून सामाजिक-सांस्कृतिक कार्याला नवे बळ
गायत्री श्री गुरुदेव सेवा महिला मंडळास भजन साहित्यामध्ये ढोलकीची कमतरता दूर…
चंद्रपूर :- वडगांव प्रभाग क्र. ८ मध्ये विकासाच्या हमीची लढाई अधिक व्यापक आणि भक्कम होत चालली असून, भावी नगरसेवक सौ. संगिता वाढई या केवळ पायाभूत सुविधांपुरत्याच मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यातही सक्रिय योगदान देताना दिसून येत आहेत. त्यांच्या या लोकाभिमुख भूमिकेला माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभत असून, समाजाशी नाळ जोडणारे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
News reporter :- अतुल दिघाडे
याच अनुषंगाने भावी नगरसेवक सौ. संगिता वाढई, माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया तसेच सामाजिक कार्यकर्ते अजय बलकी यांच्या उपस्थितीत गायत्री श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ, यांना भजन साहित्यामध्ये ढोलकीची कमतरता असल्याचे यांना माहिती मिळताच वडगांव प्रभाग क्र, ८ मधील भावी नगरसेवक सौ. संगिता वाढई, यांनी तात्काळ आपले कामे बाजूला सरावंत या भजन मंडळाला एक छान सुंदर ढोलकी उपलब्ध करुन दिली, या उपक्रमामुळे परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरांना नवे बळ मिळाले असून महिला मंडळामध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भजन, कीर्तन, प्रबोधन व संस्कार यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचारांची रुजवण व्हावी, पुढील पिढीमध्ये भारतीय संस्कृतीचे मूल्य जपले जावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वडगांव प्रभागातील गायत्री श्री गुरुदेव सेवा मंडळामार्फत सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी सर्व उपस्थित गायत्री श्री गुरुदेव सेवा मंडळातील महिला मंजूषा दोरखंडे, स्मिता खाडे, योगिता पोकळे, भारती धकाते, चंदा राजुरकर, सुनिता रुईकर, वर्षा ठाकरे, शालिनी खाडे, अर्चना चामटकर, राधा चंदूरी, निशा प्रसाद, उषा मोरे, पूनम माणूस मारे, या महिला भगिनींनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आजच्या धावपळीच्या जीवनात भक्ती, भजन आणि संस्कार जपणारे उपक्रम समाजाला दिशा देतात. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणारे नेतृत्व मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विकासाबरोबरच समाजमन जोडणारी कामे झाली पाहिजेत, तेव्हाच खरा सर्वांगीण विकास साध्य होतो, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय बलकी यांनीही अशा उपक्रमांमुळे महिला संघटनांना बळ मिळते व समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असे मत व्यक्त करत भावी नगरसेवक सौ. संगिता वाढई यांच्या कार्याचे कौतुक केले.
वडगांव प्रभागात सध्या रस्ते, नाल्या, मूलभूत सुविधा, स्वच्छता, सार्वजनिक सोयी-सुविधा यासोबतच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनाही चालना देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. त्यामुळेच भावी नगरसेवक सौ. संगिता वाढई या केवळ राजकीय चेहरा न राहता, सेवा, संस्कृती, श्रद्धा आणि माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वाचे प्रतीक म्हणून पुढे येताना दिसत आहेत.
यामुळे वडगांव प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आपुलकी, विश्वास व सकारात्मक भावना निर्माण झाल्या असून, “विकासाच्या हमीची लढाई” अधिक ठोस व प्रभावी होत चालल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि लोकाभिमुख कार्याच्या जोरावर वडगांव प्रभागात एक वेगळी सकारात्मक ओळख निर्माण होत असून, येणाऱ्या काळात हे नेतृत्व प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
—




