Home Breaking News जेटपुरा वार्ड प्रभाग क्रं, ७ विश्वासाची मशाल पेटली – भावी नगरसेविका सौ....

जेटपुरा वार्ड प्रभाग क्रं, ७ विश्वासाची मशाल पेटली – भावी नगरसेविका सौ. मनस्वी संदिप गिहे यांना नागरिकांची उत्स्फूर्त पसंती

जेटपुरा वार्ड प्रभाग क्रं, ७ विश्वासाची मशाल पेटली – भावी नगरसेविका सौ. मनस्वी संदिप गिहे यांना नागरिकांची उत्स्फूर्त पसंती

चंद्रपूर :-  चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२६ जवळ येत असताना (लक्ष्य २०२५) जेटपुरा गेट, प्रभाग क्रमांक–७ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर वार्डातील नागरिकांच्या मनात आपुलकी, विश्वास आणि विकासाची ठाम अपेक्षा निर्माण करणारे नाव म्हणजे भावी नगरसेविका सौ. मनस्वी संदिप गिहे. “पेटवू मशाल विश्वासाची… पेटवू मशाल विकासाची…” हा आशयपूर्ण नारा घेऊन त्यांनी आपल्या सेवाकार्याची दिशा स्पष्ट केली असून, जेटपुरा वार्डातून त्यांना मिळणारी वाढती नागरिकांची पसंती हे त्याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

सामाजिक बांधिलकी जपत, वार्डातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींमध्ये नेहमीच पुढाकार घेऊन मदतीला धावून येणाऱ्या मनस्वी ताई गिहे यांनी अल्पावधीतच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, नाल्यांची स्वच्छता, परिसराचे सौंदर्यीकरण, शाळा व शिक्षणव्यवस्था, अंगणवाडीचे डिजिटलीकरण, आरोग्य सुविधा, महिला व युवकांचे प्रश्न—अशा अनेक गरजू विषयांना प्राधान्य देत त्या सातत्याने काम करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

या पक्षाच्या विचारधारेतून प्रेरणा घेत, स्थानिक पातळीवर विकासाभिमुख व लोकाभिमुख नेतृत्व घडवण्याचा संकल्प मनस्वी ताई यांनी केला आहे. केवळ आश्वासनांपुरते न थांबता, प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करण्यावर त्यांचा भर असल्यानेच जेटपुरा वार्डातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व सर्वसामान्य कुटुंबे त्यांच्याकडे आशेने पाहताना दिसत आहेत.

प्रभाग क्रमांक–०७ (जेटपुरा गेट) हा सर्वसाधारण महिला गट ‘क’ असून, या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, संवेदनशील आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. ही गरज ओळखूनच मनस्वी ताई गिहे यांनी भावी नगरसेविका म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार केला आहे. “आपला प्रभाग, आपली जबाबदारी” या भावनेतून त्या प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधत असून, समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आज जेटपुरा वार्डातील गल्लीबोळात, चौकाचौकात आणि घराघरांतून एकच चर्चा ऐकायला मिळते—विकासासाठी नवा चेहरा, विश्वासासाठी नवे नेतृत्व. हीच भावना नागरिकांच्या पसंतीतून स्पष्टपणे दिसून येत आहे. सामाजिक कामाची भक्कम पार्श्वभूमी, महिलांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि वार्डाच्या सर्वांगीण प्रगतीची ठोस दृष्टी यामुळे भावी नगरसेविका सौ. मनस्वी संदिप गिहे या जेटपुरा वार्डातील नागरिकांच्या मनात आपले स्थान पक्के करत आहेत.

आगामी काळात जेटपुरा प्रभागाचा चेहरा बदलण्यासाठी, विकासाची मशाल अधिक तेजस्वी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी मनस्वी ताई गिहे या सज्ज असल्याचे चित्र आज स्पष्टपणे दिसून येत आहे.