तालुका देखरेख चंद्रपूर व बल्लारपूर गटसचिवांच्या वतीने दिनेश चोखारे यांचा गौरवपूर्ण सत्कार
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा देखरेख सहसंस्था तालुका चंद्रपूर तसेच बल्लारपूर गटसचिवांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश चोखारे यांचा शाल, श्रीफळ व ग्रामगीता देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
News reporter :- अतुल दिघाडे
या कार्यक्रमाला बँकेचे विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार, निरीक्षक रोशन तुरारे, शाखा सचिव किशोर लोणगाडगे, गटसचिव सुरेश लानोरे, तसेच गोपीचंद शेंडे, कृष्णा देवाळकर, प्रमोद मत्ते, प्रवीण अटकारी, रुपेश येडे, प्रकाश माकोडे, चंद्रकांत पहानपटे, दिनेश शेरकी, प्रवीण शेरकी, संतोष मोहजे आणि स्वप्निल कपाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की गटसचिव हा शेतकरी आणि बँक व्यवस्थेमधील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. कर्ज वितरण, विविध बँक योजनांची अंमलबजावणी, तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी गटसचिव अत्यंत मोलाचे कार्य करतात.
त्रिस्तरीय सहकारी व्यवस्थेतून कार्य करताना शेतकऱ्यांच्या प्रगतीशी एकनिष्ठ राहणे व त्यांना सातत्याने सहकार्य देणे, हीच गटसचिवांची खरी जबाबदारी आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी दिनेश चोखारे यांच्या सामाजिक, सहकारी आणि शेतकरीहिताच्या कामाची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




