Home मुंबई लक्षवेधी :- राजकारनातलं पॉवर हाऊस बनलं राजसाहेब ठाकरे यांचं शिवतीर्थ.

लक्षवेधी :- राजकारनातलं पॉवर हाऊस बनलं राजसाहेब ठाकरे यांचं शिवतीर्थ.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थावर राजसाहेब ठाकरे यांची भेट ठरली राजकीय वर्तुळात गुगली.

लक्षवेधी :-

महाराष्ट्राच्या राजकारणात एकही आमदार खासदार निवडून आला नसला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय राज्याचं राजकारणं अधुरं आहे असं म्हटलं तरी वावग ठरू नये, कारण ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय दरारा होता त्याचं प्रमाणे राजसाहेब ठाकरे यांचा दरारा आहे हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे, जेंव्हा बाळासाहेब ठाकरे सक्रिय राजकारणात होते तेंव्हा पंतप्रधान मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या मातोश्री बंगल्यावर भेटीसाठी जायचे, एवढंच नव्हे तर चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सुद्धा त्यांना भेटायला जायचे, पण बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर मातोश्रीची जागा आता राजसाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ यां बंगल्याने घेतली आहे आणि सिनेसृष्टीतील कलाकारांसोबतचं राजकीय सत्ताधारी यांच्या राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत गाठीभेटी वाढल्या आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजची शिवतीर्थावर झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान राजसाहेब ठाकरे यांचं शिवतीर्थ हे जणू राजकारनातलं पॉवर हाऊस बनलं की काय अशीच स्थिती दिसत आहे.

खरं तर राज्यांच्या राजकारणात राजसाहेब ठाकरे यांच्या एवढं राजकीय प्रगल्भ ज्ञान कुणाकडे असेल असं वाटतं नाही, कारण बाकी राजकारणी सत्तेला स्वतःच्या फायद्याकरिता वापरतात तर राजसाहेब ठाकरे यांना नाशिक महानगरपालिका मिळाली तर भारतातलं पाहिलं स्मार्ट शहर म्हणून त्यांनी नावारूपास आणलं, कारण ज्यांची कित्तेक वर्ष महानगरपालिकेत सत्ता असतांना त्या सत्तेचा उपयोग सत्ताधारी हे स्वतःच्या फायद्याकरिता करतात त्यामुळं त्यांच्या सत्ता काळात विकास होतं नाही तर फक्त कामे होतात ज्याला विकास म्हणता येत नाही, कारण आज बांधलेले रस्ते उद्या कधी तुटेल याचा नेम नसतो त्यामुळे ज्यांच्या विकास कामात दूरदृष्टी नाही तो विकास वांझोटा ठरतो, मात्र राजसाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्राप्रती जे प्रेम आहे, जे त्यांना करायचं आहे, ते अप्रतिम कारण्याचं कौशल्य त्यांच्यात आहे, कारण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचं स्वप्न त्यांचं आहे आणि एवढ्या पराभवानंतर सुद्धा त्यांचं ते स्वप्न त्यांनी सोडलेलं नाही, आजही त्यांना वाटतं की माझ्या महाराष्ट्रात नावीन्यपूर्ण असं काम झालं पाहिजे कारण त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट आहे, त्यामुळे राजकारणी आणि सत्ताधारी त्यांच्या सोबत त्या गोष्टी समजून घेण्यासाठी जातात असंही म्हटल्या जातं, पण राजसाहेब ठाकरे हे जी भूमिका मांडतात ती महाराष्ट्राच्या भल्यासाठी असतें आणि राज्यातील जनता त्यांच्या भूमिकेला समजतो पण मग त्यांचे आमदार खासदार कां निवडून येत नाही? हा प्रश्न मात्र प्रकर्षान सर्वाना आश्चर्यचकित करत असतो, मात्र राजसाहेब ठाकरे हे स्वार्थाचं राजकारणं करीत नाही, आपले उमेदवार निवडून यावे यासाठी कोट्यावधी रुपये इतर राजकीय पक्षाप्रमाणे उमेदवारांना देत नाही आणि त्यांच्याकडून कधी कुटील डाव खेळल्या जातं नाही, त्यामुळे निवडणुकीत साम दाम दंड भेद ह्या चार चाणक्य नितीचा वापर योग्य वेळी झाला नसल्याने राजसाहेब ठाकरे यांचे उमेदवार पडतात हाच आजवरचा अनुभव आहे.

काय आहे राजासाहेबांचा दरारा?

केवळ आपल्या राज्यातच नाही तर अख्ख्या भारतात ज्यांचं भाषण अतिशय गांभीर्यान बघितलं आणि ऐकलं जातंय ते राजसाहेब ठाकरे हे अतिशय अभ्यासू आहेत, हजरजाबाबीपणा आणि उत्कृष्ट मांडणी यामुळे भल्याभल्याची टर उडविण्यात त्यांचा बाणा हा जगावेगळा असतो, जे सत्त्य आहे ते भाषणात मांडून झाल्यावर ते नंतर मी असं म्हणालोच नाही असं कधी ते करत नाही तर आपल्या भूमिकेवर ठाम असतात, मागील लोकसभा निवडणुकीत खरं तर दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी स्वतःची राजकीय पोळी शेकून घेतली पण राजसाहेब ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देतांना कुठलीही अट घातली नाही, उलट भाजप उमेदवार व शिंदे यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या, एवढं निस्वार्थ राजकारण जगाच्या पाठीवर कदाचित मनसे कडून पहिल्यांदा झालं असावं असं दिसतं कारण सत्तेसाठी स्वतःच्या भावाला आव्हान देणारे राजकारणी स्वतःच्या राजकीय इच्छाशक्तीला बाजूला सारून राज्याचा विचार करतात हे केवळ राजसाहेब ठाकरे हेच करू शकतात हे आपल्या मराठी माणसांनी समजून घेतलं पाहिजे, कारण एका एका जागेसाठी युती आघाडी तुटीच्या उंबरंठ्यावर असतांना असल्या गलिच्छ राजकारणात आपण पडू नये म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी महायुती कडून लोकसभेच्या वेळी दिलेली दोन लोकसभा उमेदवारांची ऑफर नाकारली आणि माझ्या मराठी मायबोलीला मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळावा म्हणून मोदींना पाठिंबा दिला होता, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या महायुतीच्या विजयावर ताशेरे ओढत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा कानपिचक्या घेतल्या म्हणून राज्याच्या राजकारणात राजसाहेब ठाकरे यांचा दरारा आहे असं माणल्या जातंय.

देवेंद्र फडणवीस राजसाहेब ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा.

राजसाहेब ठाकरे यांना त्यांच्या शिवतीर्थावर भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस जेंव्हा गेले तेंव्हा त्यांचं राजसाहेब ठाकरे यांनी स्वागत केलं. दोघांमध्ये तब्बल २० मिनिटे चर्चा झाली. येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यात दोघांची भेट झाल्यामुळे नेमकी काय राजकीय खिचडी शिजत आहे अशी राजकीय चर्चा प्रसारमाध्यमात होतांना दिसली.

महायुतीच्या विजयावर केले होते भाष्य.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या एवढ्या जागा कश्या मिळाल्या हा प्रश्न उपस्थित करून राजसाहेब ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीवर भाष्य केलं होतं. त्यांनी निवडणूक जिंकली तरी कुणी जल्लोष करत नसल्याचं म्हटलं होत. त्यात अजित प्पावर यांना ४२ जागा मिळाल्या कशा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. त्यात अजित पवार यांनी देखील राजसाहेव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही असे पवार यांनी म्हटलं होत. ज्या अजित पवार यांनी स्वतःचा मुलगा निवडून आणला तर नाहीच पण स्वतःची बायको पण निवडून आणली नाही याबद्दल मनसे नेत्यांनी अजित पवार यांची हवा गुल केल,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here