Home चंद्रपूर धक्कादायक :- सिडीसीसी बैंकेच्या त्या संचालकांचे पद रद्द होणार, पुढील निवडणुक लढण्यास...

धक्कादायक :- सिडीसीसी बैंकेच्या त्या संचालकांचे पद रद्द होणार, पुढील निवडणुक लढण्यास सुद्धा बंदी?

मनसेची विभागीय सहनिबंधक यांच्याकड़े अपील, लवकरच निर्णय होण्याची शक्यता, ते कोण संचालक आहेत याची सर्वत्र चर्चा.

चंद्रपूर :-

कुठल्याही बैंक संचालकांना किंव्हा त्यांच्या रक्ताच्या नात्यात असलेल्या नातेवाईकांना संबंधित बैकेतुन कर्ज घेता येत नाही, जर समाजा घेतलं तर थकबाकीदार होता येत नाही, मात्र सिडिसिडी बैंकेचे ते कोण संचालक आहे, ज्यांनी बैंकेतुन कर्ज तर घेतलेच शिवाय त्यांनी ते कर्ज वेळेत परत केले नाही व थकबाकी ठेवली त्यामुळे रिजर्व बँक ऑफ इंडिया नी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला ₹ 2 लाख 50 हजार पेनल्टी लावलेली असून बँकिंग रेगुलेशन ऍक्ट 1949 चे विविध सेक्शन 20 व 56 नुसार सबसेकशन लावलेले आहेत. ही पेनल्टी बसण्याचे प्रमुख कारण कि दि.19 एप्रिल 2021 पासून बँकिंग रेगुलेशन ऍक्ट मध्ये झालेल्या बदलानुसार बँक संचालकांना कर्ज देण्यावर नियंत्रण आहे व या कर्जबाकी वेळेत भरली नसल्याने नाबार्ड चे 2021-2022 चे तपासणीत संचालकांना कर्ज दिल्याचा व कर्जबाकीबाबत उल्लेख करून Annexure 1 नुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया कडे कळविले होते. तसेच बँकेनी सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक व नाबार्ड कडे दर्शविलेल्या मुद्द्यावर पूर्तता अहवाल पाठविला होता. विभागीय सहनिबंधक वानखेडे यांना रिझर्व बँक ऑफ इंडिया चे नव्यानी दुरुस्ती माहिती असूनही तरतूदीनुसार बँक संचालकांना त्यांनी अपात्र केले नाही व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय सहनिबंधक यांनी सोईस्कररित्या कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी विभागीय सहनिबंधकवानखेडे यांच्याकड़े तक्रार करून व अपील करून त्या थकबाकीदार संचालकांहे संचालक पद रद्द करण्याची व त्यांना पुढील निवडणूक लढण्यास बंदी आणावी अशी मागणी केली आहे, त्यामुळे त्या संचालकांचे संचालक पद रद्द होण्याची कार्यवाही लवकरच होणार असल्याची शक्यता आहे.

सिडीसीसी बैंकेच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया व नाबार्ड तपासणीतील Annexure 1 मधील संचालकाना दिलेल्या कर्जाचा प्रकार,कर्ज मंजुरी दिनांक,कर्ज रक्कम,कर्ज परतफेडीचा कालावधी दि.31 मार्च 2020, 2021, 2022 व 2023 ची कर्जबाकी व कर्ज निरंक असल्यास नादेय प्रमाणपत्राची प्रत इत्यादी ची तपासणी ही विभागीय सहनिबंधक स्तरावर करून कार्यवाही करणे आवश्यक होते, मात्र त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून त्या संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न चालला होता मात्र आता विभागीय सहनिबंधक यांच्याकडे रितसर तक्रार होऊन अपील सुद्धा करण्यात येणार असल्याने अगोदरचं भ्रष्ट मार्गाने झालेल्या सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत सामील असल्याची संशयाची सुई वानखेडे यांच्यावर असल्याने पुन्हा ते दुसरी रिक्स घेणार नाही त्यामुळे ते लवकरच त्या थकबाकीदार संचालकांवर निश्चितपणे अपात्रतेची कार्यवाही करणार असल्याची दाट शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या संचालकांचे पद रद्द

छत्रपती संभाजीनगर जि. म. स. बँकेचे संचालक जावेद पटेल यांना विभागीय सहनिबंधकांनी बँकेचे संचालक म्हणून अपात्र घोषित केले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. अशोक अण्णा काळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल्यानुसार पटेल यांनी बँकेकडून १५ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याची परतफेड मुदतीत केली नाही. बँकेचे संचालक व त्यांच्या नातेवाइकांना कर्जवाटप करता येत नाही. नियमाचे उल्लंघन करून बँकेने जावेद पटेल यांना कर्जवाटप केले असून ते बँकेचे थकबाकीदार असल्यामुळे तरतुदीनुसार बँकेचे संचालक म्हणून अपात्र घोषित करावे, अशी तक्रार दिली होती. दरम्यान हिचं परिस्थिती सिडिसिडी बैंकेच्या थकबाकीदार संचालकांची असल्यामुळे यातील ते थकबाकीदार कोण संचालक आहे ज्यांचे संचालक पद रद्द होणार हे लवकरच समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here