चार ते पाचचं संचालकांच्या उमेदवारांचा आकडा100 च्या वर, सिईओ कल्याणकर यांचे सर्वात जास्त उमेदवार?
सिडीसीसी बैंकेच्या एसआयटी चौकशीतुन येणार सत्त्य बाहेर, कुणाची होईल जेल वारी याकडे सर्वांचे लक्ष.
चंद्रपूर :-
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीची चर्चा आता बैंक संचालकांच्या आपसात होणाऱ्या बंडाळीमुळे पुन्हा जोरात आहे, कारण 360 पदांच्या नोकर भरतीचे कंत्राट ज्या आयटीआय कंपनीला मिळाले त्यात एक आमदार व एक माजी संचालक यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्याचा जो प्लान तयार झाला, त्यात प्रत्येक संचालक व आमदार खासदार यांना एक कोटा देण्यात आला होता, त्यात ज्यांच्या वाट्याला जेवढे उमेदवार होते तेवढ्यानी परीक्षा पण दिली, मात्र बैंकेच्या सिइओ कल्याणकर आणि आयटीआय कपंनी यांच्या आपसी सेटलमेंट यामुळे जी जाहिरात मधेच बदलण्यात आली त्यात उमेदवार हा सेकंड क्लास असावा असे ठरविण्यात आले होते, त्यामुळे काही संचालकांनी पैसे घेऊन जी नावे कंपनीला दिली होती त्यातील थर्ड क्लास पास असणाऱ्या उमेदवारांचा नंबर लागला नाही, पर्यायाने जवळपास 9 ते 10 संचालकांची मुले हे निवड यादीतून बाद झाल्यामुळे आता संचालकांमध्ये आपसात बंडाळी होण्याची चिन्हे दिसू लागली आहे, मात्र आता शासनाकडून होणाऱ्या चौकशीतुन जे तथ्य समोर येईल त्यात बैंकेच्या नोकर भरतीचा घोटाळा खुद्द संचालक समोर आणू शकतात एवढी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
सिडीसीसी बैंकेच्या 360 पदांच्या नोकर भरतीत ज्यांनी प्रमुख भूमिका राबविली त्यांनी भरती दरम्यान कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी बैंकेचे प्रत्येक संचालक यांना त्त्यांच्या वाट्याला जेवढी माणसे दिली त्याची नावे कपंनीला देण्याचे ठरविले, त्यात प्रत्येकानी अपेक्षेपेक्षा जास्तीची नावे पण दिली, परंतु सगळ्यांना समान वाटा मिळाला तर उरणार काहीही नाही कारण काही जागा मेरिट वर दाखव्याव्या लागेल म्हणून तो संचालकांचा कोटा कमेटीने कमी केला, दरम्यान जेंव्हा लिस्ट लागली तर त्यामध्ये आपल्या उमेदवारांची नावे नाहीत, त्यामुळे संचालक चिडले आणि त्यांनी सिईओ कल्याणकर, अध्यक्ष संतोष रावत व कंपनी सिईओ यांच्यासोबत संपर्क साधला पण व्यर्थ. कारण इकडे अगोदरचं परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे माणसं आणि सिईओ कल्याणकर यांची माणसं मिळून 100 उमेदवार निवडीचा पल्ला गाठला होता, सिईओ कल्याणकर यांनी तर त्यांच्या बाहेरील जिल्ह्यातील उमेदवाराची यादी त्यांच्या कोट्यातील फायनल केली होती, त्यामुळे संचालकांच्या वाट्याला आलेली उमेदवारांची यादी अर्ध्यातच कटली आणि काहींना तर एकही जागा मिळाली नाही, म्हणून आता बैंकेच्या अंतर्गत गोटात आक्रोश आणि असंतोष असून एसआयटी, एसीबी व ईडीच्या रडारवर असलेल्या बैंकेच्या संचालकांना पळता भुई सपाट होईल अशी शक्यता आहे. दरम्यान या सर्वं कार्यवाहीत कोणत्या संचालकावर जेल वारी करण्याची वेळ येईल हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.




