शासन प्रशासनाने आरक्षण बचाव संघर्ष समितीचे मनोज पोतराजे व रमेश काळबांधे यांच्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल देवतळे यांचा टोकाचा निर्णय,
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती विरोधात मागील 2 जानेवारी पासून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे साखळी ठिय्या आंदोलन आणि 16 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु असतांना शासन प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आणि वेळकाढू धोरण यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष राहूल देवतळे यांनी सिडीसीसी बैंकेसमोर सुरु असलेल्या उपोषण मंडपात येऊन शासन प्रशासनाला इशारा दिला आहे की जर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सिडीसीसी बैंकेच्या समोर आत्मदहन करू, त्यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे जिल्हा प्रशासन पूर्णतः हादारलं असून जिल्ह्यातील ज्या हजारो तरुण बेरोजगार यांनी ही नोकर भरतीची परीक्षा दिली पण त्यांना डावलण्यात आलं ते सुद्धा आक्रमक पवित्रा घेऊ शकतात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सिडीसीसी बैंकेने आयटीआय कंपनी द्वारे जी परीक्षा दिली त्यामध्ये मोठा घोळ झाला आहे, परीक्षार्थी नी सोडविलेल्या प्रश्नानंतर परत ते उत्तर चेक केले असता दुसऱ्याच पर्यायावर टिकमार्क केलेले दिसत होते तर परीक्षार्थीना चुकीचे प्रश्न विचारले गेले व ज्या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे त्यावर कंपनीने ऍन्सर की मध्ये दुसऱ्याच उत्तरावर रिमार्क केले होते त्यामुळे ज्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली होती व त्यांना चांगले गुण मिळेल अशी अपेक्षा होती त्यांना सरळ सरळ मुलाखती पासून वंचित ठेवण्यात आलं तर ज्यांनी बैंकेचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी यांना नोकरी करिता पैसे दिले त्यांना मुलाखती करिता बोलाविण्यात आले आहे, त्यामुळे ही नोकर भरती रद्द करुन पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी व मागासवर्गीय एससी, एसटी व ओबोसी चे आरक्षण लागू करावे यासाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या पुढाकारणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांनी या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, दरम्यान भाजप ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष मनोज पोतराजे हे मागील दहा दिवसापासून तर मनसे जनहीत विधी विभागाचे रमेश काळबांधे हे पाच दिवसापासून आमरण उपोषण करताहेत पण शासन प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने जर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी आंदोलनकर्त्याच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण सिडिसिडी बैंकेच्या समोर आत्मदहन करू असा इशारा राहुल देवतळे यांनी प्रशासनाला दिला आहे. आता देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला जिल्हा प्रशासन हे शासन स्तरावर माहिती देऊन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




