पैसे घेऊन परीक्षेत पास करण्यासाठी परीक्षार्थिना प्रश्न उत्तर चा पुरवठा.केल्याचा प्रकार उघड.
परीक्षार्थी चक्क मायक्रो फोन द्वारे प्रश्नाची उत्तरे सोडविताना रंगेहात पकडला गेल्याचा व्हिडीओ व्हायरलं.
चंद्रपूर /औरंगाबाद :-
काल दिनांक 21 डिसेंबर ला झालेल्या सिडीसीसी बैंक नोकर भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक बिघाड झाल्याच्या करणावरून परीक्षा रद्द करण्याची नामुस्की बैंक व्यवस्थापन व परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनी व्यवस्थापनावर आली असतांना व या परीक्षेत सेटिंग करून बोगस नोकर भरती घेत असल्याची राज्यातील सहभागी परीक्षार्थी यांना आता खात्री झाली असतांना आता पुन्हा औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सुद्धा आज दिनांक 22 डिसेंबरला झालेल्या परीक्षेत चक्क पेपर फुटला असल्याची बाब उघड झाली असून त्यांचे व्हिडीओ व्हायरलं होत आहे, त्यामुळे आता ही नोकर भरती रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने नोकर भरती करा अशी मागणी मनसे कडून होत आहे, दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील देवराव भोंगळे व किशोर जोरगेवार या दोन आमदारांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर व परीक्षेत होत असलेल्या गैरप्रकारावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आता चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकर भरतीबाबत काय कार्यवाही करतात याकडे परीक्षार्थी चे लक्ष लागून आहे.
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरतीत बैंक अध्यक्ष संतोष रावत व संचालक मंडळ यांनी प्रत्येक उमेदवारांकडून 25 ते 35 लाख रुपये घेऊन त्यांना परीक्षेत पास करण्यासाठी त्यांनी प्रश्न उत्तरांची पीडीएफ परीक्षार्थिना पाठवून कोट्यावधीचा घोटाळा करत असल्याने ही नोकर भरती रद्द करा व नोकर भरतीत मागासवर्गीय एससी एसटी ओबीसी प्रवर्गातील जातीच्या तरुण बेरोजगार युवकांना आरक्षण लागू करून निस्पक्ष भरती प्रक्रिया करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे केली होती व याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात मागासवर्गीयांना आरक्षण मिळावे यासाठी याचिका पण दाखल केली आहे, दरम्यान त्या याचिकेवरून बैंक प्रशासनाला नोटीस देण्यात आली असून पुढील तारखेस सुनावणी होणार आहे. पण जवळपास 358 जागेसाठी होणाऱ्या या नोकर भरतीची पहिलीच परीक्षा तांत्रिक घोळ झाल्याने रद्द झाली असतांना व ज्यांनी पैसे दिले त्यांना वेगळी अरेंजमेंट होतं असल्याची बाब खुद्द चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी विधिमंडळात उचलल्याने बैंकेच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचीन्ह उपस्थित होतं होते मात्र आता परत दुसऱ्या दिवशी पण औरंगाबाद च्या डॉ आंबेडकर महाविद्यालयात एका पवन वसंत राठोड या परीक्षार्थिनी कानात मायक्रो इन्स्ट्रुमेंट व जोड्यात मोबाईल फोन ठेऊन उत्तर सोडविल्या जातांना काही परीक्षार्थिनी रंगेहात पकडले व त्याचा मोबाईल आणि मायक्रो इन्स्ट्रुमेंट जप्त केला यावरून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरतीत पैसे घेतलेल्या उमेदवारांना पास करण्यासाठी त्यांना बाकायदा सुविधा करून दिली जात असल्याने हा कोट्यावधी रुपयांचा मोठा घोटाळा बाहेर येत आहे.
चंद्रपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एका परीक्षार्थीचे विधान गंभीर.
काल चंद्रपूर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झालेल्या परीक्षेतील घोळ आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थ्यांच्या राड्यानंतर आज परीक्षेत काहीही होणार नाही अशी परिस्थिती असतांना आज सुद्धा एका परीक्षार्थीनी स्वतःच्या डोळ्यादेखत एका विद्यार्थ्याला जास्तीचा वेळ देऊन त्याला पास करण्याचे परीक्षा घेणाऱ्या आयोजकांचे मनसुबे असल्याची बाब स्वतःचा व्हिडीओ काढून उघड केल्याने ही किती भयंकर सेटिंग आहे आणि बिचाऱ्या गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांची दिशाभूल करून त्यांची किती आर्थिक लूट सुरु आहे हे स्पष्ट होत आहे आणि म्हणूनच त्या परीक्षार्थिनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं की तुम्ही परीक्षा देऊन काहीही फायदा नाही उलट तुमचे पैसे वाया जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणात आता सरकारला हस्तक्षेप करून नोकर भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी होत आहे.




