Home Breaking News चंद्रपुरात राज ठाकरेंची मोठी घोषणा, मनदीप रोडे आणि सचिन भोयर यांना विधानसभा...

चंद्रपुरात राज ठाकरेंची मोठी घोषणा, मनदीप रोडे आणि सचिन भोयर यांना विधानसभा तिकीट!

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली. चंद्रपूर येथे झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून (अनुसूचित जातीसाठी राखीव) मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी दिली आहे.

या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे,

पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मनदीप रोडे आणि सचिन भोयर यांची अनुक्रमे चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून निवड झाली आहे.या उमेदवारीमुळे चंद्रपुरात व राजुरा मध्ये नवीन बदलाव पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही,

म्हणूनस या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून सर्वांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.आता हे दोन्ही उमेदवार निवडणुकीत कितपत चांगली कामगिरी करतात यांच्या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे,