Home चंद्रपूर धक्कादायक :- काँग्रेस नेते संजयभाऊ मारकवार यांचे अपघातात दुःखद निधन.

धक्कादायक :- काँग्रेस नेते संजयभाऊ मारकवार यांचे अपघातात दुःखद निधन.

 

मूल – सावली परिसरात पसरली शोककळा !

सावली प्रतिनिधी :-

संजयभाऊ मारकवार हे सावली तालुक्यातिल गोंडपिपरी-खेडी या मार्गाने जात असताना त्यांचा या मार्गावरिल खेड़ी जवळ डॉ तुषार मारलावार यांचा शेतासमोर काल रात्री 7 वाजता च्या दरम्यान दुचाकी ने अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, संजय मारकवार हे कांग्रेसचे मूल सावली तालुक्यातील मोठे नेते होते व बाजार समिति चे संचालक, मूल पंचायत समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजना चे तालुका अध्यक्ष इत्यादी पदे ते भुषवित होते

त्यांच्या मृत्यु ची बातमी मूल सावली परिसरात कळताच अनेकांना धक्का बसला. त्यांचा मृत्यु ने परिसरात शोककळा पसरली असून अपघात कसा झाला? हे अजूनही अस्पष्ठ आहे.या घटनेचा तपास सावली पोलिस करणार आहे.