Home Breaking News दखल :- सिडीसीसी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेची एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री फडणवीस यांची...

दखल :- सिडीसीसी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेची एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही.

सिडीसीसी च्या संचालकांनी मागासवर्गीयांचं आरक्षण डावलून लोकशाहीची हत्त्या केल्याने त्यांची चौदावी करुन उपोषणाची केली सांगता.

चंद्रपूर:-

संपूर्ण राज्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीचा घोटाळा गाजत असतांना आरक्षण बचाव संघर्ष समिती च्या वतीने मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन व दिनांक 16 जानेवारी पासून समिती सदस्य मनोज पोतराजे आणि 21 जानेवारी पासून रमेश काळबांधे यांचे आमरण उपोषण सुरु होते, दरम्यान या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील शिपाई आणि लिपीक पदाच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांचे हक्काचे आरक्षण हिरावण्यात आले होते व या नोकर भरतीच्या परीक्षेत प्रचंड गैरप्रकार करण्यात येऊन 25 ते 40 लाख रुपये परीक्षार्थी यांच्याकडून घेऊन नोकऱ्या वाटप करण्याचा धडाका बैंक अध्यक्ष व संचालकांनी लावला होता, त्या विरोधात अनेक सामाजिक संघटना मिळून आरक्षण बचाव संघर्ष समिती स्थापित करुन दिनांक 2 जानेवारी आंदोलन सुरु होते, आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या नेतृत्वात समितीचे शिष्ठमंडळ यांनी दिनांक 27 जानेवारीला मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विंनती केली की सिडीसीसी बैंकेत मोठा भरती घोटाळा झालेला आहे या विरोधात आम्हचे सहकारी आमरण उपोषण करत आहे, त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, दरम्यान या आंदोलनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन खुद्द उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांना भ्रमणध्वनी वरून कॉल करुन विचारपूस केली आणि आपण बैंकेची पूर्णतः चौकशी करू आपण उपोषण मागे घ्या असे आवाहन केले होते, त्यामुळे राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उपोषणकर्ते मनोज पोतराजे आणि रमेश काळबांधे यांना ज्यूस देऊन आमरण उपोषण सोडविण्यात आले, दरम्यान मागासवर्गीय एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण हटवून संविधाणाची एक प्रकारे पायमल्ली करण्यात आली आणि लोकशाहीची हत्त्या करण्यात आली असल्याने बैंक संचालकांची चौदावी करुन आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.

सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीच्या परीक्षेत घोळ करुन हुशार विद्यार्थ्यांना कमी गुण देऊन जवळपास 25 ते 40 लाख देणाऱ्या परीक्षार्थी यांना जास्तीचे गुण देऊन पात्र ठरविण्यात आले, दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीयच एसआयटी मार्फत चौकशी करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदने देण्यात आली होती व दिनांक 27 जानेवारीला आरक्षण बचाव संघर्ष समितीचे समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, बंडू हजारें व अनुप यादव यांनी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपास्थितीत सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट कारभाराची एसआयटी द्वारे चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण या सिडीसीसी बैंकेची निश्चितपणे चौकशी करु आणि जो भ्रष्टाचार झाला असेल किंव्हा नोकर भरतीत अनियमितता झाली असेल तो चौकशीतुन समोर आणू असे आश्वासन शिष्ठामंडळाला दिले होते, तो शब्द पाळत त्यांनी उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संवाद साधत सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीची चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे

सिडीसीसी बैंकेच्या संचालकांची चौदावी करुन उपोषणाची सांगता.

मागील १४ दिवसांपासून उपोषणावर असलेले मनोज पोतराजे आणि नऊ दिवसांपासून बेमदुत उपोषणावर असलेले रमेश काळबांडे यांच्या उपोषणाची चर्चा सर्वत्र असताना आज बुधवारला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला आणि त्यांनी संवाद साधत तुमच्या मागण्या करिता मी चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत जी अनियमितता आहे त्याची पण चौकशी होईल त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले, दरम्यान राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडवले पण तब्बल १४ व्या दिवशी उपोषण आंदोलन करण्याची वेळ आणणाऱ्या बैंकेच्या संचालकांच चौदावी करुन श्राद्ध घालण्याचा आणि भावपूर्ण श्रद्धांजली चा चौदावीचा कार्यक्रम करुन उपोषण आंदोलनाची सांगता करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी एखाद्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला फोन करणं ही पहिलीच घटना.

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक आंदोलने आजपर्यंत झाली आणि ती शासन प्रशासनाच्या मंत्री किंव्हा मोठ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतुन आंदोलने मागे घेण्यात आली मात्र सिडीसीसी बैंकेच्या विरोधातील आरक्षण बचाव संघर्ष समितीच हे आंदोलन तब्बल 28 दिवस चाललं आणि याची दखल घेत दस्तूरखुद्द मुख्यमंत्री यांनी उपोषणकर्त्या मनोज पोतराजे यांना भ्रमणध्वनीवरून संवाद साधत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले, कदाचित ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच घडली असल्याची माहिती आहे. दरम्यान प्रदीर्घ काळ चाललेल्या या आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी समितीचे समन्वयक राजू कुकडे, उपोषणकर्ते मनोज पोतराजे, रमेश काळबांधे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, बंडू हजारें, अनुप यादव, नभा वाघमारे, राजू बिट्टूलवार, राजेश बेले, मिलिंद खोब्रागडे, महेंद्र खंडाळे, दिनेश एकवणकर, अभी वांढरे, प्रमोद देरकर व असंख्य समाज संघटनाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.