Home चंद्रपूर नाते रक्ताचे – एक प्रेरणादायी उदाहरण….

नाते रक्ताचे – एक प्रेरणादायी उदाहरण….

 

नाते रक्ताचे – एक प्रेरणादायी उदाहरण….

चंद्रपूर :- आजच्या समाजात रक्तदान ही एक अतिशय महत्त्वाची आणि जीवनरक्षक कृती आहे. आपल्या समाजात अनेक रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही, ज्यामुळे त्यांचे जीवन संकटात येते. अशा परिस्थितीत, ज्या व्यक्ती रक्तदान करतात, ते समाजासाठी एक अमूल्य उपकार करतात.

News reporter :- अतुल दिघाडे

अशाच एका उदाहरणाची आज चर्चा करुया. थालेसीमिया असलेल्या ११ वर्षाच्या वैशाली कुंटेवाड या मुलीला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. शासकीय रुग्णालयात रक्ताची कमतरता होती आणि तिचे आई-वडील मुलीला रक्त मिळवण्यासाठी धडपडत होते. पण त्यानंतर, नाते रक्ताचे ग्रुपमध्ये सक्रिय रक्तदाता जितेंद्र मशारकर यांना या बाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तत्काळ पुढे येऊन मुलीला जीवनदान देण्यासाठी रक्तदान केले.

वयाच्या ४२ व्या वर्षी वाढदिवसानिमित्य त्यांनी औचित्य साधून ७२ वे रक्तदान करून पवित्र कार्यात सहभाग घेतला. जितेंद्र मशारकर यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे, कारण त्याच्यामुळे मुलीला जीवनदान मिळाले आणि तिचा उपचार कळीच्या टप्प्यावर सुरू होऊ शकला. विशेष म्हणजे ते स्वतःचा वाढदिवस आणि मुलाचे वाढदिवस नेहमी रक्तदानाने साजरे करतात हे विशेष.

यावेळी अक्षय राठोड आणि किसन नागरकर हे देखील उपस्थित होते आणि रक्तदान करण्यासाठी आवश्यक मदतीचे योगदान दिले. रक्तदानाच्या या कृतीमुळे समाजातील एक महत्त्वाचा संदेश सर्वत्र गेला – रक्तदान हेच जीवनदान आहे.

आपण सर्वांनी या कृतीचे अनुकरण करायला हवे. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदान करा आणि आपले समाजकार्य साकार करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here