रेती माफिया स्वप्नील काशीकार यांच्या अटकपूर्व जामीनला गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू जबाबदार? काय आहे हा प्रकार?
चंद्रपूर :-
रेती माफिया स्वप्नील काशीकर यांनी कुलथा रेती घाटात अवैध रेती उचल करण्यासाठी अडवणूक करण्यासाठी आलेल्या तारडा ग्रामपंचायतीचे सरंपच तरूण उमरे व त्यांच्या सोबत आलेल्या गावातील महिला व तरुणांना बेदम मारहान केल्या प्रकरणी त्यांचेवर कलम 307 अन्वये गोंडपिपरी पोलीस स्टेशनं येथे गुन्हे दाखल झाले होते, त्यात फिर्यादी हे आदिवासी असल्याने आरोपी विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ अंतर्गत (अॅट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला पण गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरु यांनी आरोपीना अटक केली नाही दरम्यान या प्रकरणात स्वप्नील काशीकार हा फरार झाला होता व अटकपूर्व जामीन करिता त्यांनी न्यायालयात अपील दाखल केली होती,
खरं तर स्वप्नील काशीकर यांच्यावर विविध प्रकरणात याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. मागील काळात काशीकर यांनी वनविभागाच्या अधिका-यांची बंदूक हिसकवून मारहाण केली होती व त्यात त्यांनी कारागृहात वर्ष काढले होते असे असताना व कलम 307( ठार मारण्याचा प्रयत्न करणे) हा गंभीर गुन्हा असताना न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळत नाही, परंतु गोंडपिपरी पोलिसांनी स्वप्नील काशीकर यांना वाचविण्यासाठी त्यांचे यापूर्वीचे गुन्हे न्यायालयात सादर न करता व अॅट्रॉसिटी कायाद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करता आम्हचा तपास पूर्ण झाला असा न्यायालयात रिपोर्ट सादर केला, त्यामुळे स्वप्नील काशीकर यांना न्यायाल्याने अटकपूर्व जामीन मंजूर केला. जामीन मिळताच दुसऱ्याच दिवशी शिवा वझरकर याची हत्त्या स्वप्नील काशीकर यांनी घडवून आणली, जर गोंडपिपरी पोलिसांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली असती तर स्वप्नील काशीकर याला जामीन मिळाला नसता व शिवा वझरकर या तरुणाची हत्त्या झाली नसती. हा अतिशय खेदजनक प्रकार असून यासाठी गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू हे जबाबदर असून त्यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
स्वप्नील काशीकरच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त
शिवा वझराकर हत्त्या प्रकरणाचा संपूर्ण तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशिकर याच्या कार्यालयाची स्थानिक गुन्हे शाखेनं झडती घेतली असता त्याच्या ऑफीसच्या सोफ्यातून एक लोखंडी तलवार, एक एअर गन, ऑफीस टेबलच्या खाली एक लोखंडी तलवार, एक स्टीलचे खंजीर असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. हा शस्त्रसाठा पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा कुठून आला, याबाबत सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे,



