Home चंद्रपूर लक्षवेधी :- आमदार किशोर जोरगेवार यांना इव्हेंट करण्यासाठी जनतेने निवडून दिलंय का?

लक्षवेधी :- आमदार किशोर जोरगेवार यांना इव्हेंट करण्यासाठी जनतेने निवडून दिलंय का?

इकडे जनतेच्या ज्वलंत समस्या असतांना त्या सोडवयाच्या सोडून आमदार धार्मिक, सामाजिक उत्सवात मग्न…

लक्षवेधी :-

चंद्रपूर शहरात पेट्रोल डिझेल करिता रांगा लागल्या पण आमदार मात्र कुठेही दिसलें नाही, घरगुती व्यवसायिक गैस चा तुटवडा आहे याबद्दल त्यांचा जनतेला संदेश नाही, स्थानिक कंपन्याच्या दडपशाही विरोधात कामगार संघटना आंदोलनात उतरल्या पण त्यांचं त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, स्थानिक गोरगरिबांच्या व्यक्तिगत समस्या आहे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा न्यायोचित नाही, शहरातील तालुक्यातील विकास कामाकरिता आपण निधी आणल्याच्या जाहिराती झळकतात पण विकास दिसत नाही, मात्र महाकाली महोत्सव असो, आमदार चषक अंतर्गत महिला व पुरुषांचे कबड्डी सामने असो, बॉडीबिल्डिंग स्पर्धा असो, प्रभू श्रीराम जन्मोत्सव असो, ढोल ताशा महावादन असो, रामनवमी शोभा यात्रा असो इत्यादी धार्मिक सामाजिक इव्हेंट हिरो हिरोईन यांना बोलावून करणं हेच त्यांचं आमदार म्हणून काम सुरु आहे, यावरून आमदार जोरगेवार यांना केवळ इव्हेंट करण्यासाठी इथल्या जनतेने निवडून दिलंय का? असा प्रश्न पडतो.

लोकप्रतिनिधींची जनतेप्रती मुख्य जबाबदारी म्हणजे त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवणे, पारदर्शक कारभार करणे, विकासकामे करणे आणि मतदारांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणे होय, एवढंच नव्हे तर समाजातील गरजा ओळखून कायदे आणि धोरणे बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असतें, पण आमदार किशोर जोरगेवार यांची जबाबदारी मात्र जणू त्यांनाच ठाऊक नाही, जे जोरगेवार जनतेला 200 युनिट वीज मोफत देणार हे सन 2019 च्या निवडणुकीत गाजर दाखवून निवडून आले आणि चिक्कार पैसा कामावला आणि स्वतःचे आश्वासन पाळले नाही आज ते स्वतःचे मूळ मुद्दे बासनात गुंडाळून जी कामे सामाजिक धार्मिक संस्थानी, संघटनांनी करायला हवी ती कामे ते करत आहे आणि ज्यासाठी त्यांना जनतेने मतदान करून निवडून दिलं ते काम त्यांच्याकडून होतं नाहीय, ही केवळ लोकशाहीची शोकांतिकाचं नाही तर हे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचं दुर्भाग्य म्हणावं लागेल.

चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या राजकीय कोलांटउडया मारल्या. काँग्रेस, राकॉ (शरद पवार गट) आणि अखेरीस भाजप अशा विविध पर्यायांची चाचपणी केल्यानंतर, स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध डावलून, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवली आणि जिंकले, पण एकेकाळीचे भाजप चे लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मागे भाऊ भाऊ म्हणून फिरणारे व त्यांच्याच पैशाने आणि पुण्याईने राजकीय क्षेत्रात यश मिळविल्यानंतर मात्र त्यांना जणू सत्तेचा ज्वर झाला, एवढंच काय त्यांनी आपल्या गुरुतुल्य नेत्याला पण आव्हान देणे सुरु केले, मात्र राजकीय क्षितिजावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवून लोकनेता म्हणून ज्या सुधीर मुंगनटीवार यांनी नावलौकिक मिळवीला त्यांना आव्हान देणं म्हणजे पाण्यात राहून मगराशी वैर कारण्यासारखं आहे हे आमदार किशोर जोरगेवार यांनी समजून घेणं गरजेचं आहे अन्यथा माजी आमदार म्हणून बिरूद लागण्याची वेळ त्यांचेवर लवकरच येण्याची शक्यता आहे.
.