Home Breaking News सन २०२३ मध्ये जि. प. कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या सर्वसाधारण बदल्यांबाबत वेळापत्रक केले...

सन २०२३ मध्ये जि. प. कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या सर्वसाधारण बदल्यांबाबत वेळापत्रक केले जाहीर

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  येथील जिल्हा परिषदेंतर्गत विविध संवर्गातील वर्ग 3 तसेच ४ मधील कर्मचाऱ्यांच्या सन २०२३ या सत्रातील सर्वसाधारण बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे.

यामध्ये ६ व ७ मे २०२३ रोजी जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहामध्ये समुपदेशनाने प्रशासकीय तसेच विनंती बदली केली जाणार आहे. एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची मुख्यालयांतर्गत बदली केली जाणार आहे. आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण, वित्त विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांचा समावेश आहे.

या विभागातील कर्मचाऱ्यांची बदली

आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण, वित्त विभाग, कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, पंचायत विभाग, शिक्षण तसेच सामान्य प्रशासन विभागातील संवर्ग ३ तसेच ४ अंतर्गत कर्मचायांची बदली होणार आहे. वर्ग ३ मधील सर्व संवर्गात प्रशासकीय व विनंती बदली होणार आहे.

अशी आहे बदली पक्रिया शनिवार, ६ मे व रविवार, ७ मे २०२३ रोजी जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, १६ ते २५ मे या कालावधीत पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरावरील समुपदेशन बदली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

६ मे २०२३

आरोग्य विभाग, महिला व बाल

कल्याण, वित्त विभाग, कृषी, पशुसंवर्धन विभाग बदली ■ सिंचन विभाग, ग्रामीण पाणी

७ मे २०२३

पुरवठा विभाग, बांधकाम विभाग,

पंचायत विभाग, शिक्षण विभाग,

सामान्य प्रशासन विभाग.