Home भद्रावती शिंदे परिवाराचे पुन्हा एक योगदान, शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील ओपीडी निशुल्क.

शिंदे परिवाराचे पुन्हा एक योगदान, शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील ओपीडी निशुल्क.

 

जिल्ह्यात आरोग्य सुविधा मोफत देऊन शिंदे परिवाराने जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधले.

कोरोना पॉझिटिव्ह न्यूज विशेष :-

जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने जनजिवन विस्कळीत झाले आहे. कारण सरकारी आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरत आहे, अर्थात एकीकडे वाढलेल्या कोरोणा विषाणुच्या प्रादुर्भावाच्या परीस्थितीत अनेक वाईट व दु:खद घटना समोर येत असल्या तरी दुसरीकडे रूग्ण व नातेवाईकांना सुखावणाऱ्या काही विशेष घटना देखील घडत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी जिथे प्रशासनाला केवळ सल्ले देऊन स्वतःची वर्तमान पत्रात बातम्याद्वारे जाहिरात करत आहे मात्र दुसरीकडे भद्रावती तालुक्यात भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोणा विषाणुबाधित व ईतर रुग्णांकरीता वैद्यकीय सुविधा गेल्या महिनाभरापासून सुरु आहेत. या उपक्रमांतर्गत श्री मंगल(शिंदे) कार्यालय येथे कोविड केअर सेंटर उभारुन ते प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. या सेंटरमधे निशुल्क उपचार व भोजन व्यवस्था, सोबतच ऑक्सीजन, सॅनिटायजरसह आरोग्य विषयक सेवा पुरवून आवश्यक औषधीसाठा सुध्दा पुरविला जात आहे. मागणीप्रमाणे कोविड सेंटरला ईतर आवश्यक त्या सर्व सेवा पुरवीणे अविरत सुरु आहेत. अनेक रूग्ण या निशुल्क कोविड सेंटरचा लाभ घेत आहेत. हेल्पलाईन व्दारा वैद्यकीय सल्ला व त्रस्त रुग्णांना तात्काळ चंद्रपुर जिल्ह्यातील रुग्णालयामधे दाखल करुन घेण्यासाठी मदतकार्य सुरु आहे. त्यामुळे शिंदे परिवाराने कोरोना च्या या भयंकर परिस्थितीत मोफत आरोग्य सेवा पुरवून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

अशातच आता शिंदे मल्टीस्पेशालिटी हॅास्पीटलमधे कोरोनाबाधित व ईतर रुग्णांकरीता निःशुल्क ओपिडी सुरु करून रुग्णांसाठी आपले सर्वोच्च योगदान शिंदे परिवाराने कोरोना संकटाच्या काळात दिल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होतं आहे. शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील शुक्रवार (दि.30 एप्रिल) पासून कोरोनाबाधित व ईतर रुग्णांकरीता निशुल्क ओपिडी सुरू केलेली आहे. गरजू रूग्णांनी या मोफत ओपीडी चा लाभ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर सांयकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत घ्यावा असे आवाहन डॉ. विवेक नि. शिंदे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी केले आहे.